गोखले ब्रीजला समांतर जलवाहिनी होणार भूमिगत

गोखले ब्रीजला समांतर जलवाहिनी होणार भूमिगत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले ब्रीजला समांतर असलेल्या दोन जलवाहिन्या लवकरच मुंबई महापालिकेकडून भूमिगत करण्यात येणार आहेत. जल विभागाने याबाबतचा पत्रव्यवहार ब्रीज विभागासोबत केला आहे. त्यामुळे गोखले ब्रीजच्या कामानंतर या कामाची सुरुवात महापालिकेकडून होण्याची शक्यता आहे.
गोखले ब्रीजचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेने मन्सूनच्या आधीच ही कामे पूर्ण करण्याची डेडलाईन आहे. त्यामुळे या कामानंतरच जलवाहिनी भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुंबई पश्चिम उपनगरात अंधेरी, सांताक्रूझ, विलेपार्ले या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या ५० मीटर आणि ३० मीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या गोखले ब्रीजला लागूनच समांतर अशा पूर्व-पश्चिम गेलेल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या भूमिगत करण्यासाठी जल विभागाने पुढाकार घेतला आहे. मायक्रो टनेलिंगच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या जलवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. सध्या रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवरून या जलवाहिन्यांची पूर्व आणि पश्चिम अशी कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वेला डीसी एसी रूपांतरणामध्ये आणखी उंचीची ओव्हरहेड वायर या ठिकाणी टाकावी लागणार आहे. त्यामध्ये जलवाहिनीचा सध्या अडथळा आहे. त्यामुळेच ही जलवाहिनी भूमिगत करण्यात येणार असल्याचे कळते.
...
प्रतीक्षा करावी लागणार
सध्या पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या मेगा ब्लॉकमध्ये रेल्वेच्या भागातील ९० मीटरचा भाग पाडण्याचे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. या कामानंतर दोन्ही बाजूंना गर्डरला आधार देण्यासाठी पिलर टाकणार आहेत. त्यासाठी जागा मोकळी करण्यासाठीची विनंती पालिकेला केली आहे. पिलरच्या कामानंतर गर्डर लाँच करण्यात येईल. त्यामुळे गोखले ब्रीजचे काम महत्त्वाच्या टप्प्यात येईपर्यंत जलविभागाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com