धारावीत शिवसेनेचा बेस्टवर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत शिवसेनेचा बेस्टवर मोर्चा
धारावीत शिवसेनेचा बेस्टवर मोर्चा

धारावीत शिवसेनेचा बेस्टवर मोर्चा

sakal_logo
By

धारावी, ता. १२ (बातमीदार) : वाढीव वीज देयक व वीज देयक वेळेवर मिळत नसल्याने धारावीतील रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून त्रासलेले आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी आज (ता. १२) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धारावी विधानसभा क्षेत्रातर्फे धारावी बेस्ट आगार येथील वीज बिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात संत रोहिदास मार्गावरील लक्ष्मी बाग येथून करण्यात आली.
धारावीतील रहिवासी ‘बेस्ट’च्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत. त्यातच अनामत रकमेची मागणी ‘बेस्ट’कडून केली जात आहे. वीज बिलात वाढ झाली आहे. वीज देयक वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी धारावीत वाढत आहेत. सर्वसामान्यांना ऑनलाईन वीज बिल भरण्यात अनेक अडचणी येत असल्याने शिवसेनेतर्फे हा मोर्चा धारावी विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, वसंत नकाशे, टी. जगदीश, युवासेना विभाग अधिकारी रोजित खैरे यांच्‍यासह महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते.