रस्ते कर, मालमत्ता भाडेवाढ रद्द करा

रस्ते कर, मालमत्ता भाडेवाढ रद्द करा

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेने नव्याने लागू केलेला रस्ता कर, मालमत्तांच्या भाड्यात केलेली वाढ यासह सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाजपच्या माजी नगरसेवकांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त दिलीप ढोले यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी रस्ता कर व मालमत्ता भाडेवाढ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी अलीकडेच नवीन दहा टक्के रस्ते कर लावण्यास मान्यता दिली आहे. आगामी वर्षात मालमत्ता कराच्या देयकात तो समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या विविध मालमत्तांच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही मुद्द्यांसह अन्य विषयांवर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेतली. यावेळी माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी स्थायी समिती सभापती राकेश शहा, माजी नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, भगवती शर्मा, अशोक तिवारी व मनोज दुबे आदी उपस्थित होते.
रस्ते करामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा बोजा पडणार आहे. तसेच सामान्य नागरिक वापरत असलेल्या महापालिकेच्या मालमत्तांच्या भाड्यात केलेल्या वाढीचाही त्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे रस्ते कर व भाडेवाढ रद्द करावी, त्याचबरोबर रस्त्यावर उभ्या राहाणाऱ्‍या वाहनांवर पार्किंग शुल्क लावण्याचा निर्णय मागे घ्यावा, भारतरत्न गानसाम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृह महासभेने संमत केलेल्या ठरावानुसार नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात यावे, आदी मागण्या असणारे निवेदन आयुक्तांना यावेळी देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com