सारशीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारशीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा
सारशीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

सारशीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती विक्रमगड आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सारशी येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती संदीप पावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी गटविकास अधिकारी हनुमंतराव दोडके, सभापती यशवंत कनोजा, उपसभापती विनोद भोईर, सहाय्यक गटविकास अधिकारी ईश्वर पवार, सदस्य सुभाष भोये, गट शिक्षणाधिकारी शिनगारे, विस्तार अधिकारी शंकर भोईर, सारशी सरपंच गणेश कुराडा, केंद्रप्रमुख किरण रोडे, अजित भोये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देवराम कामत आदी उपस्थित होते. या वेळी संदीप पावडे, हनुमंतराव दोडके, यशवंत कनोजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेतील विजयी संघास ए. पी. एस. सोशल वेल्फेअर अँड युथ एम्पॉवरमेंट फाऊंडेशनतर्फे चषक देण्यात आले. या स्पर्धेत जि. प. शाळा सारशीचे शिक्षक संजय आयरे, सुनील विघ्ने यांच्यासह तालुक्यातील शाळेचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.