बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळेवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळेवाटप
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळेवाटप

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळेवाटप

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यात विविध उपक्रम राबवून विक्रमगड येथील शिवसैनिकांनी (उद्धव ठाकरे गट) बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली. विक्रमगड येथील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाच्या वक्त्यांनी उजाळा दिला. विक्रमगड ग्रामीण रुग्णालय येथे गरोदर महिला व रुग्णांना फळ व बिस्कीटवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख संजय आगिवले, माजी उपसभापती नम्रता गोवारी, शहरप्रमुख योगेश भानुशाली, नरेश गोवारी, युवा सेनेचे अभिषेक जाधव, ऋषिकेश ढोन्नर, प्रशांत पालवी, अतिष भानुशाली, अक्षय भानुशाली, शाम वाघेरा, मिलिंद महाकाळ तसेच शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.