२५ वर्षे सुरक्षित सेवेबद्दल एसटी चालकांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२५ वर्षे सुरक्षित सेवेबद्दल एसटी चालकांचा गौरव
२५ वर्षे सुरक्षित सेवेबद्दल एसटी चालकांचा गौरव

२५ वर्षे सुरक्षित सेवेबद्दल एसटी चालकांचा गौरव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत विनाअपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्निक सत्कार केला जाणार आहे.
प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजारांचा धनादेश असे या सत्काराचे स्वरूप आहे. राज्यभरात प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये विभाग नियंत्रक यांच्या हस्ते व मुख्यालयात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते चालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
सध्या एसटी महामंडळाकडे २४ हजार ३८९ चालक कार्यरत असून अशा गौरव समारंभाच्या माध्यमातून विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा सत्कार हा इतर चालकांना प्रेरणादायी ठरावा आणि भविष्यात अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांची संख्या वाढून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी सर्व चालकांनी घ्यावी, अशी अपेक्षा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे.
...
विभागनिहाय गौरवप्राप्त चालकांची यादी
विभागाचे नाव - चालक संख्या
औरंगाबाद २८
बीड १५
जालना १५
लातूर ५२
नांदेड १७
उस्मनाबाद २३
परभणी १
औरंगाबाद प्रदेश १५१
मुंबई ९
पालघर १३
रायगड १९
रत्नागिरी २०
सिंधुदुर्ग १२
ठाणे ११
मुंबई प्रदेश ८४
नागपूर ३२
भंडारा १६
चंद्रपूर ११
गडचिरोली ८
वर्धा २
नागपूर प्रदेश ६९
पुणे ४१
कोल्हापूर ३१
सांगली ३०
सातारा ३९
सोलापूर ५६
पुणे प्रदेश १९७
नाशिक ३२
धुळे
जळगाव २६
अहमदनगर २३
नाशिक प्रदेश ८९
अकोला ३९
अमरावती ४३
यवतमाळ ३२
बुलडाणा ७२
अमरावती प्रदेश १८६
सचिवीय शाखा, मध्यवर्ती कार्यालय मुंबई ३
मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे १
एकूण ७८०