वीज ग्राहक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज ग्राहक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
वीज ग्राहक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

वीज ग्राहक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

sakal_logo
By

पालघर, ता. ५ (बातमीदार) : महावितरण विजेच्या युनिटमध्ये प्रचंड दरवाढ करीत आहे. या दरवाढीने महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लहान उद्योगधंदे यांच्यावर अन्याय होणार आहे. ही दरवाढ इतर राज्यांच्या तुलनेने खूपच जास्त आहे. तरी ही दरवाढ मागे घेण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना पालघर जिल्ह्याच्या वतीने वीज महावितरणचे अधीक्षक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे.
महावितरण कंपनीने रेकॉर्ड ब्रेक दरवाढीची मागणी केलेली आहे. महावितरणची याचिका २६ जानेवारी रोजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. या याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७ हजार ६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी करण्यात आली आहे. एकूण दोन वर्षांचा हिशोब करता ही मागणी म्हणजे दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रतियुनिट इतकी म्हणजे सरासरी ३७ टक्के दरवाढीची आहे. स्थिर वा मागणी आकार, वीज आकार व वहन आकार या तिन्ही आकारांत वाढीची मागणी असून एकूण परिणामी वाढ सरासरी २.५५ रु. प्रतियुनिट आहे. दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार तो वेगळाच आहे. इतकी प्रचंड मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षांत प्रथमच करण्यात आलेली आहे.

------------
दरवाढीला हरकती नोंदवा
देशात सर्वाधिक दर असूनही इतकी प्रचंड मागणी राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना धक्का देणारी, येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उ‌द्योगांना राज्याबाहेर ढकलणारी आहे. या धाडसी मागणीसाठी महावितरण निश्चितच कौतुकास पात्र आहे. महावितरणच्या या भरमसाठ दरवाढ मागणीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व वीज ग्राहक व विविध औद्योगिक शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी विरोध करावा आणि प्रचंड प्रमाणात हरकती नोंद कराव्यात, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

फोटो ः पालघर येथे महावितरणच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देताना.