महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद

मुंबई, ता. ५ ः यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महानगरांप्रमाणेच ग्रामीण भागांसाठी व त्याचप्रमाणे रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांसाठीही मोठा निधी पुरविण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे मुंबई सचिव आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक कर्पे यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या सिंचनासाठी ४०० कोटी, रस्ते सुधारणांसाठी ७६५ कोटी, पर्यावरणपूरक पोक्रा प्रकल्पासाठी ५९० कोटी, पुणे मेट्रोसाठी १,२०६ कोटी, मुळा-मुठा नदी शुद्धीकरणासाठी २४६ कोटी, बुलेट ट्रेनसाठी जवळजवळ २,००० कोटी, मुंबई मेट्रोसाठी ५०० कोटी, एमयूटीपीसाठी १६३ कोटी, ग्रीन मोबिलिटीसाठी २१५ कोटी, नागपूर मेट्रोसाठी ११८ कोटी, नागनदीसाठी २२४ कोटींच्या निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी सोळा हजार कोटी रुपये दिले आहेत. या निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड नगर-बीड-परळी नागपूर-नागभीड हे राज्यातील मोठे रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा मानस आहे. राज्यात लवकरच १० ‘वंदे भारत’ गाड्या सुरू होणार आहेत, असेही व्यवसायाने सनदी लेखापाल असलेल्या कर्पे यांनी दाखवून दिले.
यंदाच्या अर्थसंकल्पातून वास्तववादी आणि आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण समतोल साधण्याचे काम झाले आहे. केंद्र सरकारने आयकर भरणारे सामान्य करदाते, तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांना जादा सवलती दिल्या आहेत; तर वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या तरतुदींमुळे गंभीर आजारांवरही भारतात यशस्वी उपचार होतील. पीएम आवास योजनेवरील खर्चाची तरतूद वाढवून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे ध्येय ठेवल्यामुळे भूमी आणि जलप्रदूषण रोखता येईल, असेही त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पामध्ये कृषी पतसंस्थांना बहुउद्देशीय सोसायटीचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे गाव पातळीवर सहकार बळकट होईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू होत आहे. रेल्वे प्रवास वेगाने होण्यासाठी रेल्वेच्या डब्यांचे वजन कमी करण्यात येणार आहे. यासाठी ॲल्युमिनियमचा वापर करण्याबरोबर सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यावरही भर दिला जाईल. तसेच पायाभूत सुविधांच्या विकासात महामार्गांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात आला आहे, असेही कर्पे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com