पश्चिम रेल्वेवर १२ विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्या

पश्चिम रेल्वेवर १२ विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्या

मुंबई, ता. ५ : रेल्वे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते उधना-भगत की कोठी आणि उधना ते मुंबई सेंट्रल-हिसार स्थानकांदरम्यान १२ विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे क्रमांक ०९०९३ भगत की कोठी स्थानकापर्यंतची स्पेशल रेल्वे मुंबई सेंट्रल येथून दर शनिवारी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. ही रेल्वे ४ ते १८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०९०९४ भगत की कोठी-उधना विशेष गाडी दर रविवारी दुपारी १२.१५ वाजता भगत की कोठी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता उधना येथे पोहोचेल. ही रेल्वे ५ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०९०९१ उधना-हिसार सुपरफास्ट स्पेशल उधना येथून दर बुधवारी दुपारी १.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२५ वाजता हिसारला पोहोचेल. ही रेल्वे ८ ते २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०९०९२ हिसार-मुंबई सेंट्रल स्पेशल हिसारहून दर गुरुवारी रात्री १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही रेल्वे ९ ते २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत धावणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com