Thur, March 23, 2023

विरारमध्ये तरुणीची आत्महत्या
विरारमध्ये तरुणीची आत्महत्या
Published on : 6 February 2023, 11:08 am
नालासोपारा, ता. ६ (बातमीदार) : विरार मध्ये एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना रविवार रात्री घडली आहे. या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही मात्र प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिसेल मॅन्युल रोझारिओ (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती विरार पूर्व मनवेलपाडा परिसरात कुटुंबासह राहत होती. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविला आहे, असे विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.