डोळखांब, मांजरेमध्‍ये काँग्रेसचे हात जोडो अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोळखांब, मांजरेमध्‍ये काँग्रेसचे हात जोडो अभियान
डोळखांब, मांजरेमध्‍ये काँग्रेसचे हात जोडो अभियान

डोळखांब, मांजरेमध्‍ये काँग्रेसचे हात जोडो अभियान

sakal_logo
By

शहापूर, ता. ७ (बातमीदार) : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विस्तारित कार्यक्रम म्हणून काँग्रेसने ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू केले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व तालुकाध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली डोळखांब, रानविहिर, मांजरे या तीन ग्रामपंचायतीमध्ये हात से हात जोडो अभियान राबविण्यात आले.
डोळखांब येथे गावदेवी मंदिरात नारळ वाढवून शहरात पदयात्रा काढण्यात आली. रानविहिर, अवळपाडा, निभळपाडा येथे पत्रके वाटण्यात आली. डोळखांब नाक्यावर पदयात्रा संपून कॉर्नर सभा घेण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, अभियान निरीक्षक परशुराम पितांबरे, महिला तालुकाध्यक्षा संध्या पाटेकर, रोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष शैलेश अधिकारी यांनी भाषणातून राहुल गांधी यांचा संदेश सांगून देशात निर्माण झालेल्या अराजकता व वाढत्या महागाई आणि बेरोजगारीवरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला.