म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ८४९ सदनिकांसाठी सोडत जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे 
८४९ सदनिकांसाठी सोडत जाहीर
म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ८४९ सदनिकांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ८४९ सदनिकांसाठी सोडत जाहीर

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या ८४९ सदनिका आणि ८७ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ आज करण्यात आला. या सोडतीसाठी ९ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपासून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असून १० मार्च ही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. MHADA Housing Lottery System IHLMS २.० ॲपद्वारे किंवा https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अनामत रकमेच्या स्वीकृती ९ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार असून ११ मार्च रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे १३ मार्च रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १८ मार्च रोजी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.