कळंबोलीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयात लोकार्पण

कळंबोलीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयात लोकार्पण

नवीन पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : पनवेल परिसरातील नागरिकांचे प्रश्न, त्याचबरोबर समस्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कळंबोलीत प्रशस्त असे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आले आहे. संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या या कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर व कळंबोली येथील शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
कळंबोली, सेक्टर-३ ई येथे सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे, लातूरचे संपर्कप्रमुख ॲड. श्रीनिवास क्षीरसागर, महानगर संघटिका ॲड. सुलक्षणा जगदाळे, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, नवीन पनवेल शहरप्रमुख शिवाजी थोरवे, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, माजी महिला बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर, भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष रवीनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, अमर ठाकूर, प्रियंका गाडे, उद्योजक अमित घारापुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी अशा प्रकारच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना जनसामान्यांची कामे करणार असल्याचे सांगितले. शासनाच्या योजना जनतेपर्यंत येथूनच पोहोचवण्यात येतील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराबरोबरच या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण करून त्यांना वेगळ्या शुभेच्छा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे रामदास शेवाळे यांनी या वेळी सांगितले.

--------
जाहीर पक्षप्रवेश केलेले कार्यकर्ते
स्वराज ग्रुप कळंबोली व अमरराजे वामन, प्रशांत जाधव, आतीष पाटील, रोशन, राहुल सुबे, गणेश सोले, बारकू पांडुके, प्रवीण भालेराव, नीलेश अनभुले, मोहन शेलार, अमोल नालकोल, ओमकार जाधव, रमेश गरुड, प्रल्हाद गिते, गणेश कडाली, अमोल पाठक, संदीप पाटील, सचिन डांगरे, अविनाश पाटील, बंटी पवार, गणेश औटे, योगेश औटे, शंकर खाडे, संतोष औटे, रोहण राजगुरू, वैभव उमापे, रामदास पांडुळे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com