Sun, March 26, 2023

आमदार वनगा यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
आमदार वनगा यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
Published on : 12 February 2023, 12:55 pm
कासा, ता. १२ (बातमीदार) : पालघर मतदारसंघातील रस्ते विकासकामांसाठी आमदार श्रीनिवास वनगा यांनी आमदार निधीतून निधी मिळवून दिला आहे. त्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. वेती वरोती, मुरबाड, पिंपळशेत येथील १० रस्त्यांसाठी एक कोटी रुपयांच्या निधीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील रस्ते खराब झाले होते. त्यासाठी या भागातील नागरिकांची रस्त्यांसाठी मागणी होत होती. स्थानिक आमदार वनगा यांनी पाठपुरावा करून आपल्या निधीतून हे रस्ते करण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यकर्ते संतोष देशमुख, चारोटी सरपंच महादेव तांडेल, वेती वरोती सरपंच, मुरबाड सरपंच, माजी सदस्य राजकुमार गिरी, सुदाम कदम, राजेश कासट व ग्रामस्थ उपस्थित होते.