विक्रमगड मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस जल्लोषात

विक्रमगड मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस जल्लोषात

मोखाडा, ता. १२ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून, मुलांना खाऊ व पांघरूण वाटप करून, तसेच विक्रमगड विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला आहे. या वेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या माध्यमातून तसेच बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, मोखाडा नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख अमोल पाटील, विक्रमगड तालुकाप्रमुख सागर आळशी, जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम, मोखाडा पंचायत समिती सभापती भास्कर थेतले, सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने मोखाडा तालुक्यातील वसतिगृहे व कस्तुरबा गांधी विद्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोखाडा येथे जिजाऊ संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नगराध्यक्ष अमोल पाटील व प्रकाश निकम यांनी भेट दिली. जव्हार येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com