महाडमध्ये १८ तोळे सोने लंपास

महाडमध्ये १८ तोळे सोने लंपास

पोलादपूर, ता. ११ (बातमीदार) : महाड तालुक्यातील राजेवाडी येथील एका घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरांनी १८ तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. महाड शहर पोलिस ठाण्यात अब्दुल हमीद हसनमिया सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी त्याच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील १८ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती दिली. या दागिन्यांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, हार, चैन अशा व इतर मौल्यवान वस्तूसह पाच लाख चाळीस हजार रुपयाच्या सोन्याचा ऐवज चोरी झाला आहे. महाड शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला, असून या गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर हे करीत आहेत. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण अलिबाग रायगड पथक दाखल झाले असुन अधिक तपास सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com