पदपथांसाठी आज चांदिवलीत आंदोलन

पदपथांसाठी आज चांदिवलीत आंदोलन

घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः चांदिवलीतील रखडलेला डीपी रोड आणि पदपथांसाठी उद्या रविवारी (ता. १२) चांदिवलीतील सिटीझन वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे. चांदिवलीच्या ९० फूट रोडवर होणाऱ्या शांततापूर्ण आंदोलनासाठी सुमारे २५० रहिवाशी सहभागी होणार आहेत. चांदिवली येथील रखडलेला डीपी रस्ता आणि रहदारीचे चांगले रस्ते व पादचाऱ्यांना अनुकूल पदपथ या मागण्यांसाठी सिटीझन वेल्फेअर असोसिएशनने वारंवार पत्रव्यवहार करून महापालिकेकडे संपर्क साधला. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कंटाळलेल्या रहिवाशांनी आंदोलन करण्याची घोषणा केली असल्याचे असोसिएशनचे सदस्य मनदीप सिंग यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com