नडगाव ग्रामपंचायतीमार्फत कापडी पिशव्यांचे वाटप

नडगाव ग्रामपंचायतीमार्फत कापडी पिशव्यांचे वाटप

खर्डी, ता. १२ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील नडगावच्या सरपंच व महिला सदस्यांनी नुकताच अनोख्या पद्धतेने हळदी-कुंकू समारंभ समाजमंदिरात साजरा करत ग्रामनिधीमधून महिलांना कचराकुंड्या व कापडी पिशव्यांचे वाटप केले. या समारंभातून सरकारच्या स्वच्छ भारत अभियान आणि प्लास्टिक बंदी या निर्णयाचे स्वागत करत स्वच्छतेचा संदेश देण्‍यात आला. यावेळी उपस्थित महिलांना गुलाब पुष्प व अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या कल्पनेतून साकारण्यात आला होता. यावेळी सरपंच कमल रेरा, ग्रा. पं. सदस्या संगीता मांजे, आशा मांजे, चंद्रकला दुर्गे, वैशाली खंडवी, संगीता पानसरे, विजया मुकणे या सर्वांनी मिळून या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com