वाहिवाटीतील जमीनतून बेदखल करण्याचा प्रयत्न

वाहिवाटीतील जमीनतून बेदखल करण्याचा प्रयत्न

वज्रेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील बासे या गावी एका आदिवासी व्यक्तीच्या पारंपरिक कब्जे वाहिवाटीत असलेल्या जागेतून दडपशाही व दमदाटी देऊन बेदखल करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. या भूमाफियावर अट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी एकता परिषद व विकास संस्थेचे दशरथ वळवी यांनी येथील गणेशपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि,बासे येथील परशुराम वळवी हे आपल्या कुटुंबासह येथील सर्व्हे नंबर २५/६ जागेतील ३५ गुंठे जागेत वर्षानुवर्षे घर बांधून व भात शेती, तूर, वाल लागवड करून उदरनिर्वाह करतात. त्याच सर्व्हे नंबरमध्ये गणपत मते व सागर गवाळे यांची ४५ गुंठे जागा आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ते फक्त ४५ गुंठे जमिनीचे हकदार आहेत. मात्र असे असूनसुद्धा लगतच असलेल्या परशुराम वळवी या आदिवासी कुटुंबाच्या ३५ गुंठे जागेवर कुऱ्हाडी घेऊन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच दादागिरीने शेतातील पिकेही चोरून नेत असल्याची वारंवार तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करूनही अद्यापपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही.
आदिवासीच्या पारंपरिक ताब्यात असलेली जमीन क्षेत्र ०३५-२० च्या विरोधात दिवाणी न्यायालय भिवंडी यांनी कोणतेही आदेश दिले नाही तरी त्या आदेशाचा गैरवापर करून गणपत मते व सागर गवाळे हे या आदिवासी कुटुंबावर दडपशाहीने अत्याचार करत असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा शेतीच्या जागेवर जाऊन आम्ही कुटुंबासह उपोषणास बसणार असल्याचा इशारा आदिवासी एकता परिषद व आदिवासी विकास संस्थेचे दशरथ वळवी यांनी गणेशपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

-------------
बासे येथील ४५ गुंठे जमीनाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही पोलिस बंदोबस्त देऊ. मात्र नक्की या जागेच्या हद्दी व जागा निश्चितीबाबत भूमिअभिलेख यांचा विषय आहे, तो दोन्ही जमीन मालकांनी सामंज्यसपणे आपापसात सोडूवन घ्यावा. अन्यथा जे कायदेशीर आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.
- संजय एन. साबळे, पोलिस निरीक्षक, गणेशपुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com