वसईत फ्लेमिंगोचे आकर्षण

वसईत फ्लेमिंगोचे आकर्षण

वसई, ता. १४ (बातमीदार) : वसईकरांना नेहमीच फ्लेमिंगो पक्षाचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने शहर सुशोभीकरण करत असताना शंभर फूट मार्गावर फ्लेमिंगोची प्रतिकृती एका चौकात उभारली आहे.
इराण, भारत, श्रीलंका, दक्षिण चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी वसईत येत असतात. त्यातील एक स्थलांतरित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो आहे. उंच मान, गुलाबी पंख असलेला हा पक्षी पाणथळ जागी थव्याने राहतो. त्याच धर्तीवर फ्लेमिंगोची प्रतिकृती उभारण्यात आली. यातील एका पक्ष्याची मान खाली असल्याने तो भक्ष्य शोध घेत तरी नाही ना, असा विचार ही प्रतिकृती पाहिल्यानंतर वसईकरांच्या मनात येत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com