कामोठेतील कृषी महोत्सवाची सांगता

कामोठेतील कृषी महोत्सवाची सांगता

नवीन पनवेल, ता. १३ (वार्ताहर)ः महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथे सुरू असलेल्या रायगड जिल्हा कृषी महोत्सवाची अखेर सांगता झाली. या महोत्सवाला राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विविध तंत्रज्ञानामधून शेतकऱ्यांनी कृषी उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ही केले.
राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी रायगड जिल्हा कृषी महोत्सवास सपत्निक भेट दिली. यावेळी कृषी विभागाच्या दालनामधील जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण कृषी उत्पादनाच्या नमुन्यांची त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे विभागाने केलेले जलकुंड, पॉलिहाऊसची पाहणी केली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागांनी तयार केलेल्या पौष्टिक तृणधान्य दालनातील कृषी विभागाच्या रायगड जिल्ह्यातील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी तयार करून आणलेल्या पौष्टिक तृणधान्यांच्या विविध पक्वान स्टॉलला भेट देत तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी होत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. याशिवाय आयुक्तांनी सर्व स्टॉलची पाहणी करत शेतकरी व महिला बचत गटातील सदस्यांना पॅकिंग व ब्रॅण्डिंगवरती लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले.
-----------------------------------
पाककला स्पर्धा विशेष आकर्षण
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पाककला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी महोत्सवाला भेट देणाऱ्यांना मिळाली. याप्रसंगी आयुक्तांनी पीक स्पर्धा योजनेतील लाभार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com