पनवेलमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला

पनवेलमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला

पनवेल, ता. १४ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लोकसहभागातून पनवेल शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबाबतची नियोजन बैठक नुकतीच आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विविध शाळांनी, संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे
दोन वर्षे कोरोनाकाळ असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पनवेल शहरात महापालिकेच्या माध्यमातून निघणारी मिरवणूक काढण्यात आली नव्हती. मात्र, यंदा महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. यात शहरातून काढण्यात येणारी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य आकर्षण ठरणार आहे. या मिरवणुकीत लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक यांची स्पर्धा होणार आहे. तसेच मिरवणुकीची सुरूवात सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार असून मिरवणुकीचा शेवट टपाल नाक्यावरील छ.शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा चौकामध्ये होणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
-------------------------------------
लोकसहभागावर विशेष भर
आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शिवजयंती उत्सवाचा खर्च लोकसहभागतून होणार असल्याने नागरिकांनी देणगी देण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com