जिल्हा कॉपीमुक्त करणार

जिल्हा कॉपीमुक्त करणार

पालघर, ता. १४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षाकाळात परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये म्हणून शासनस्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवले जाऊन कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी पालक, शिक्षक, विद्यार्थी यामध्ये जागृती निर्माण करून पालघर जिल्हा कॉपीमुक्त केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी किरण महाजन, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, शिक्षणाधिकारी संगीता भागवत आदी अधिकारी उपस्थित होते.
दहावीची परीक्षा दोन मार्चपासून तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी फेब्रुवारी, मार्च २०२३ च्या परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. परीक्षा सनियंत्रणासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी सलग्न असलेल्या इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले.

-----------
अधिक पोलिस बंदोबस्त पुरवणार
पालघर जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तेथील कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. परीक्षा काळात गैरप्रकार होणार नाही याची दक्षता परीक्षा केंद्रप्रमुख, त्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी दक्षता घ्यायची आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर सर्वसाधारण परीक्षा केंद्रापेक्षा अधिक पोलिस बंदोबस्त पुरवण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात परीक्षा केंद्रावर दररोज भरारी पथके जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com