दमण बनावटीच्या मद्यच्या साठ्यासह दोन आरोपींना अटक

दमण बनावटीच्या मद्यच्या साठ्यासह दोन आरोपींना अटक

मनोर, ता.१४ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील बोईसर ऐना रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून दमण बनावटीच्या अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दमण बनावटीच्या मद्य वाहतुकीवर कारवाईसाठी मंगळवारी रात्री ऐना बोईसर रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी एका संशयित चारचाकीची तपासणी केली असता यामध्ये दमण बनावटीचा मद्यसाठा आढळून आला.या चारताकीमधील १८ बॉक्समधून १९७ बल्क लिटर दमण बनावटीचा मद्यसाठा आणि एकचार चाकी असा सहा लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अविनाश पाटील आणि वाहनचालक राम चौधरी यांना अटक करण्यात आली असून हा मद्यसाठा आरोपी अविनाश पाटील याने खानवेल येथून अनोळखी इसमाकडून घरी लग्नकार्यासाठी खरेदी केल्याची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com