‘जुनी पेंशन’ मिळवून देणे माझे कर्तव्य

‘जुनी पेंशन’ मिळवून देणे माझे कर्तव्य

कासा, ता. १६ (बातमीदार) : सरकारी-निमसरकारी सेवेत नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर तत्कालीन सरकारने लादलेली नवीन अंशदायी पेंशन योजना अन्यायकारक असून त्यांना जुनी पेन्शन योजना मिळवून देणे, हे माझे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले.
के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये आयोजित सत्कार सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मुक्त संवाद साधला. आज जरी मी आमदार झालो असलो, तरी आमदार झाल्याची हवा माझ्या डोक्यात कधीही जाऊ देणार नाही, तर मतदारसंघातील सर्वांचे प्रश्न सोडविण्याचा धडाका पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवीन, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. विधान परिषद शिक्षक मतदारसंघातून मिळविलेल्या मोठ्या विजयानंतर तळकोकणातील सिंधुदुर्गपासून सुरू केलेला मतदारसंघातील कार्यकर्ते भेट दौरा उत्तर कोकणातील डहाणू येथे त्यांनी पूर्ण केला. या वेळी पालघर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेमार्फत त्यांचा सत्कार करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पंकज कोरे, माजी नगराध्यक्ष भरत राजपूत, के. एल. पोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक रवीद्र बागे, चंद्रकांत खुताडे, शशी पाटील, विठ्ठल ठाणगे, जयदीप पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com