क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला

क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने सेल्फी काढायला नकार दिल्याने चाहत्याने त्याच्या कारवर हल्ला केला. ओशिवरा परिसरात बुधवारी (ता. १५) ही घटना घडली आहे. कारवर हल्ला करून प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजाराची मागणी केली. या प्रकरणी दोघांविरोधात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गुरूवारी (ता. १६) संध्याकाळी ओशिवरा पोलिसांनी संशयित महिलेला अटक केली आहे.

पृथ्वी त्याच्या मित्रासह कारमधून ओशिवरा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बुधवारी रात्री गेला होता. त्या ठिकाणी शोबित ठाकूर आणि सना गिल हे चाहते त्याच्या टेबलाजवळ येत तिने त्याच्यासोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. काही फोटो आणि व्हिडीओ काढूनही तो थांबला नाही, तेव्हा पृथ्वीने रेस्टॉरंटच्या मालकाला फोन करून चाहत्यांना हटवण्यास सांगितले. त्यानुसार व्यवस्थापकाने चाहत्यांना तेथून हटवले. मात्र यामुळे संतापलेले दोन्ही चाहते रेस्टॉरंटबाहेर क्रिकेटपटूची वाट पाहत राहिले. त्यांना पृथ्वीबरोबर सेल्फी घ्यायचा होता; पण पृथ्वीने त्यांना नकार दिला आणि तो कारमधून निघून गेला. मात्र ते दोघे त्याच्या कारच्या मागे धावले. सेल्फीला नकार दिल्याने त्यांनी रागातून त्याच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याला कोणताही दुखापत झाली नाही. त्यानंतर आरोपींनी पृथ्वीच्या व्यावसायिक मित्राकडे प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजाराची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी त्याला दिली. यानंतर त्याचा मित्र कार घेऊन ओशिवरा पोलिस स्टेशनला दाखल झाला. याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सना गिल हिला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com