चार सुपरफास्ट विशेष रेल्वेच्या वारंवारतेत वाढ

चार सुपरफास्ट विशेष रेल्वेच्या वारंवारतेत वाढ

मुंबई, ता. १६ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी पश्चिम रेल्वेने चार सुपरफास्ट विशेष गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक ०२२०० वांद्रे टर्मिनस-वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी) साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (प्रत्येक शनिवारी) १ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. रेल्वे क्रमांक ०२१९९ वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी)-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर गुरुवारी) २९ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. रेल्वे क्रमांक ०१९०६ अहमदाबाद-कानपूर सेंट्रल साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर मंगळवारी) २७ जून २०२३ पर्यंत आणि रेल्वे क्रमांक ०१९०५ कानपूर सेंट्रल-अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर सोमवारी) २६ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. रेल्वे क्रमांक ०४१६६ अहमदाबाद-आग्रा कॅंट साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर गुरुवारी) २९ जून २०२३ पर्यंत आणि रेल्वे क्रमांक ०४१६५ आग्रा कॅंट – अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर बुधवारी) २८ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. रेल्वे क्रमांक ०४१६८ अहमदाबाद-आग्रा कॅंट साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर सोमवारी) २६ जून २०२३ पर्यंत आणि रेल्वे क्रमांक ०४१६७ आग्रा कॅंट – अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर रविवारी) २५ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com