ठाणे परिवहन भरतीला ब्रेक

ठाणे परिवहन भरतीला ब्रेक

ठाणे, ता. १८ (वार्ताहर) ः दर वर्षी परिवहनमधून सेवानिवृत्त होणारे, कोरोनाच्या महामारीत मृत पावलेले, नैसर्गिक मृत झालेले कर्मचारी आणि अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया रखडली आहे. यामुळे येणाऱ्या काळात बसची संख्या वाढत जात असतानाच दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडण्याची शक्यता निर्माण होणार आहे. २०२३ अखेर १४० कर्मचारी होणार निवृत्त होणार आहेत; तर दरवर्षी सरासरी १५० च्या आसपास परिवहन कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली.
ठाणे परिवहनला भरारी मिळत असून मेअखेर परिवहनमध्ये आवश्यकतेनुसार बसची संख्या पुरेशी होण्याची शक्यता आहे. नुकत्याच ११ इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावू लागलेल्या आहेत; तर २० सीएनजी बस आणि अतिरिक्त बस समाविष्ट होणार आहेत. येणाऱ्या काळात मात्र परिवहनच्या ताफ्यात तब्बल १२३ बसचा समावेश होणार आहे. त्यामुळे परिवहनच्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या वाढणार आहे.

---------------------------
१,४९० स्थायी; तर १७२ कंत्राटी कर्मचारी
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात कायमस्वरूपी कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या १ हजार ४९० एवढी आहे; तर १७२ विविध क्षेत्रातील कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये १२५ महिला वाहक, ३२ सफाई कर्मचारी आणि १५३ पुरुष वाहकांची संख्या आहे. तूर्तास परिवहनच्या बस कमी धावत असल्याने कर्मचाऱ्यांची अतिरिक्त संख्या असली, तरीही बसेसची संख्या वाढल्यास मात्र येणाऱ्या काळात मान्यष्यबळाची कमतरता जाणवणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.

----------------------
१०० पेक्षा अधिक अनुकंपा भरती प्रलंबित
ठाणे परिवहनमध्ये स्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरीला अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्याचा नियम आहे. मात्र अनुकंपा तत्त्वावरील तब्बल १५ वर्षांपासून रांगेत असलेल्या १०० पेक्षा अधिक संख्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या १५ वर्षात भविष्यात परिवहनमध्ये आवश्‍यकता भासल्यास भरती केल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती यांची वयोमर्यादा ओलांडल्या नंतर नोकरीचे काय? या दिरंगाईचा फटका परिवहन सेवेतील मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना बसतो आहे.

--------------------
वर्षाला सरासरी १५० निवृत्त
ठाणे परिवहन सेवेत स्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या १,४९० कर्मचाऱ्यांची संख्या आहे; तर १७२ कंत्राटी कर्मचारी यांची संख्या आहे. प्रत्येक वर्षी स्थायी कर्मचारी यांच्या संख्येनुसार परिवहनमधून सरासरी १५० कर्मचारी हे सेवानिवृत्त होतात; तर २०२३ या वर्षात १४० कर्मचारी हे सेवानिवृतीच्या उंबरठ्यावर आहेत. १०० पेक्षा अधिक कर्मचारी हे अनुकंपा तत्त्वावर भरती प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मनुष्यबळ आवश्यक असणार आहे. मात्र आकृतिबंध झाला नसल्याने भरतीप्रक्रियेला ब्रेक लागलेला आहे.


=====-------------
प्रत्येक वर्षी सरासरी १५० च्या आसपास कर्मचारी निवृत्त होतात. परिवहनचा आकृतिबंध झालेला नाही. आवश्यकता भासल्यास कंत्राटी भरती होणार आहे. परिवहनच्या बस वाढल्यास ठाणेकरांचा प्रवास हा सुखकर होणार आहे.
- भालचंद्र बेहरे, व्यवस्थापक, ठाणे परिवहन


स्थायी कर्मचारी १४९०
कंत्राटी कर्मचारी १७२
दर वर्षी निवृत्त १५०
अनुकंपा प्रलंबित १००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com