ओसाड जागेत १२ हजार झाडांची लागवड

ओसाड जागेत १२ हजार झाडांची लागवड

नवीन पनवेल, ता. १८ (वार्ताहर)ः सध्याच्या काळात वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. झाडांचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात वन विभागाच्या जागेत १२ हजारपेक्षा अधिक झाडे लावून दीपक फर्टिलायझर कंपनीने ओसाड जागेचे नंदनवन करण्याचे काम केले आहे.
तळोजा एमआयडीसी येथील दीपक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सीएसआर फंडातून २०२०-२०२२ या दोन वर्षात तब्बल १२ हजार ४२० झाडांचे संगोपन केले आहे. आपल्या कंपनीचा इतर कंपन्यादेखील आदर्श घेतील, असे या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आले. सध्याच्या काळात झाडांची खूप आवश्यकता आहे. २०१९ मध्ये दीपक फर्टिलायझरतर्फे तळोजाजवळ ११ एकर जागेमध्ये ९ हजार ७०० झाडे लावण्यात आली होती. महाळुंगी हद्दीत बुधवारी वृक्षलागवडीचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी कंपनीचे मुकुंद अग्रवाल, डीपी सिंग, राजेंद्र थोरात, कृष्णात बेलेकर, वामन कराळे, राजेश देशपांडे, विठ्ठल जाधव, विनेश निमकर, एस. एन. पंडित, अनुराधा सेकर, परिमंडळ वन अधिकारी जी. टी. अडकर, वनरक्षक पी. एस. इंडी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com