पहाडी दिवाभित घुबड आढळले डोंबिवलीत

पहाडी दिवाभित घुबड आढळले डोंबिवलीत

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : हिमालय पर्वतीय प्रदेशात, काश्मिरमध्ये आढळणारे दिवाभित घुबड हे डोंबिवलीत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोंबिवलीतील गोपाळनगर येथील एका रहिवाशांच्या घरात हे घुबड आले होते. प्राणीमित्र निलेश भणगे यांनी या घुबडाची सुटका केली आहे. गेल्या दहा वर्षात ठाणे, मुंबई परिसरात प्रथमच हे दिवाभित घुबड दिसल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात घुबड आले होते. परिसरातील कावळे त्याच्या मागे लागले असल्याने घाबरुन त्याने एका घराच्या बाल्कनीचा आसरा घेतला होता. याची माहिती पॉज संस्थेचे संस्थापक निलेश भणगे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ प्राणीमित्र ओंकार साळुंखे याला रेस्क्यूला पाठवले. ओंकार याने घुबडची सुटका केली आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. त्याला सुखरुप निसर्गाच्या सान्निध्यात सोडल्याचे निलेश यांनी सांगितले. दिवाभीत किंवा साज शिंगी या जातीतील हे घुबड आहे. ठाणे, मुंबई परिसरात गेल्या दहा वर्षात या जातीचा प्रथमच हा घुबड आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

------------------
कसा दिसतो दिवाभित घुबड?
डोंबिवलीत सापडलेल्या घुबडाचा आकार लहान असून कानांवर पिसे आहेत. राखट रंगाचे हे घुबड असून त्याचा रंग पिवळी झाक असलेला राखट-पिंकट, त्यावर बारीक रेखीव काळ्या रेषा आहेत. खालील अंगाचा रंग पिवळट आणि त्यावर दाट काळ्या रेषा आहेत. नर व मादी दिसायला सारखे असतात. डोंगराळ भागात हे आढळून येतात. या घुबडांचे खाद्य हे छोटे पक्षी, कीटक, उंदीर आणि सस्तन प्राणी आहे, असेही निलेश भणगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com