संरक्षक कठडा नसल्याने ट्रक नाल्यात

संरक्षक कठडा नसल्याने ट्रक नाल्यात

कासा, ता. १९ (बातमीदार): डहाणू-नरपड मार्गावर चिखला ते नरपड दरम्यान असलेल्या पुलावर संरक्षक कठडा नसल्याने भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पडल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचालक बचावला आहे.
या राज्यमार्गांवर अनेक ठिकाणी पुलावर संरक्षण कठडे नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी घोलवडहून डहाणूकडे जाणारा ट्रक रात्रीच्या वेळी चिखला ते नरपड दरम्यान असलेल्या पुलावरून खाली कोसळला. त्यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. याबाबत नरपड येथील बहुजन विकास आघाडीचे उपसंघटक सचिन राऊत यांनी सांगितले की, ‘या पुलावरून दोन्ही बाजूस संरक्षक कठडा नाही, त्यात पुलाजवळ मोठे वळण आहे तेथील झाडे वाढल्याने पुढील येणारे वाहन दिसत नसल्यामुळे येथे अपघात होत आहेत. याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही, ते उपाय योजना करीत नाहीत’. यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने येथे लक्ष देउन येथे संरक्षक कठडा व सूचना फलक लावावेत अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com