किन्हवलीत गुलाबपुष्प देऊन परीक्षार्थींचे स्वागत

किन्हवलीत गुलाबपुष्प देऊन परीक्षार्थींचे स्वागत

किन्हवली, ता. २१ (बातमीदार) : मंगळवारपासून सुरू झालेल्‍या बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांचे किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयातील शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी संचालक सुभाष हरड, किन्हवली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कमलेश बच्छाव आदी उपस्थित होते.
विद्यालयात परिसरातील आठ माध्यमिक विद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे एकूण ६०६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असल्याचे केंद्रसंचालक गोपाळ वेखंडे व उपमुख्याध्यापक बी. एल. दिनकर यांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून आर. जे. सावंत, एच. ओ. उबाळे, जी. टी. खकाळ यांची नेमणूक केली आहे.
--------------------------------------------------
डोळखांबमध्ये शिक्षक व समितीमार्फत परीक्षार्थींना शुभेच्छा
किन्हवली, ता. २१ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे नव्यानेच सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक व स्‍कूल कमिटीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर डोळखांब येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली. परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी विद्यालयाचे प्राचार्य एम. के. कोंगेरे व स्‍कूल कमिटी सल्लागार समिती अध्यक्ष विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. डोळखांब परीक्षा केंद्रावर न्यू इंग्लिश स्कूल डोळखांब व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा टाकीपठार येथील एकूण २४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.
केंद्र संचालक जगदीश भोईर, दक्षता समितीचे सदस्य तथा पोलिस पाटील रामचंद्र फर्डे व प्रकाश राऊत, तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मनोगतातून तसेच प्रतिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com