नवी मुंबईत ३५ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

नवी मुंबईत ३५ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : मॅथाक्युलॉन नावाचा ३५ लाख रुपयांचा अमली पदार्थ नवी मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे. यात एपीएमसी येथून चार जण; तर खारघर, सेक्टर ३५ येथून दोन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एपीएमसी येथील कारवाई पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक माणिक नलावडे, वासिम शेख, नीलेश शेवाळे यांच्या पथकाने केली; तर खारघर येथील कारवाई पोलिस निरीक्षक विजयसिंह भोसले, पोलिस उपनिरीक्षक प्रताप देसाई यांनी केली.

मणीपूर येथून वसई येथे अमली पदार्थविक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे तस्कर एपीएमसी परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी सापळा रचला होता. त्या ठिकाणी होंडा सिटी कारमधून आलेले तस्कर अलाउद्दीन मोहम्मद फजुरुद्दीन मौलाना (वय २६), अब्दुल कलाम मोहम्मद अबोलोन (वय ५१), मोहम्मद मुकिम यासीन सिद्धीकी (वय ४०) आणि फैयाज साफिक अहमद (वय ३०) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २५० ग्रॅम वजनाचे ३० लाख रुपये किमतीचे मॅथाक्युलॉन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अमली पदार्थ नेण्यासाठी वापरलेली होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत खारघर सेक्टर- ३५ मधील तळोजा जेल रोडकडून टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर दोन आफ्रिकन नागरिक मॅथाक्युलॉन हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (ता. १९) दुपारी सापळा लावण्यात आला होता. या वेळी ॲनी चिमेजी बेन्जामिन (वय २५) व प्रिन्स एनडी ॲडविन न्युडे (वय ३५) या दोन तस्करांना अटक करण्यात आले. ॲनी चिमेजी बेन्जामिन याच्याजवळ २७.७८ ग्रॅम वजनाचे २ लाख ७७ हजार रुपये किमतीचे; तर प्रिन्स एनडी ॲडविन न्युडे याच्याकडे २८.८६ ग्रॅम वजनाचे २ लाख ८८ हजार रुपये किमतीचे प्लास्टिकच्या पारदर्षक पिशवीत मॅथाक्युलॉन हा अमली पदार्थ तसेच मोबाईल फोन आढळून आले. मॅथेक्युलन पावडर जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com