कोण आहे राजा ठाकूर

कोण आहे राजा ठाकूर

कोण आहे राजा ठाकूर
रविचंद ऊर्फ राजा ठाकूर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. जानेवारी २०११ मध्ये ठाणे - बेलापूर रस्त्यावर कळवा येथील विटावा पुलाखाली दीपक पाटील नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी म्हणून राजा ठाकूर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एप्रिल २०१९ पासून तो जामिनावर आहे; मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्याने पोलिसांसमोर हजेरी न लावल्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने त्याला येऊर येथून अटक केली होती. त्यानंतर तो पुन्हा जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याची अनेक राजकीय पुढाऱ्यांशी जवळीक वाढल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने शहरात होर्डिंग्ज लावले होते. तसेच, कळवा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. आता राऊत यांनी ठाकूरचे नाव घेतल्याने त्याचे शिंदेंसोबतचे असलेले संबंध चर्चिले जात आहेत.
---
राऊत बंधू मांडवली बादशहा ः नरेश म्हस्के
केवळ सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी हा प्रकार केला असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. संजय राऊत आणि त्यांचा भाऊ हे मांडवली बादशहा असून अनेक गुंडांची मांडवली करण्याचे काम ते करतात, असा आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका अद्याप मांडली नाही; पण ते गेल्या आठवड्याभरापासून आजारी असून मंगळवारी सकाळीच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती म्हस्के यांनी दिली.
----
संजय राऊत यांनी केलेले आरोप हे निराधार आहेत. माझा आणि श्रीकांत शिंदे यांचा काही संबंध नाही. माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे आणि यावर मी कायदेशीर मार्गाने कारवाई करणार आहे.
- राजा ठाकूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com