प्रतिनिधीकडूनच कंपनीला दीड कोटींचा चुना

प्रतिनिधीकडूनच कंपनीला दीड कोटींचा चुना

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी दुबईला पाठवण्यात आलेल्या प्रतिनिधीने माल विक्रीतून मिळालेले एक कोटी ४२ लाख रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसन्ना दिलीपराव देशपांडे याच्याविरोधात नेरूळ पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

देवधर पांडे यांची नेरूळ सेक्टर-१७ मध्ये ‘जय माता दी इंटरनॅशनल’ ही कंपनी असून अनेक देशांमध्ये फळे आणि भाजीपाला निर्यात करते. त्यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये प्रसन्ना देशपांडे याला कंपनीचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. मार्च २०२१ मध्ये त्याने मागणीनुसार पांडे यांच्याकडून हापूस आंबे, हिरवी मिरची, लिंबू आदी मालाची मागणी केली होती. त्यानुसार पांडे यांनी कंपनीच्या वतीने तब्बल एक कोटी ४२ लाखांचा माल दुबईसाठी निर्यात केला होता. त्यावेळी प्रसन्ना याने हा माल विकून त्याची रक्कम वसूल केली. मात्र, ही रक्कम त्याने कंपनीच्या खात्यात जमा न करता अपहार केला. त्याने ग्राहकांकडून मालाचे पैसे येणे असल्याची माहिती पांडे यांना दिली. बराच कालावधी होऊन दुबईतील ग्राहकांकडून मालाची रक्कम न आल्याने पांडे यांनी प्रसन्ना याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पांडे यांनी दुबई येथे जाऊन खात्री केली असता, प्रसन्ना याने रकमेचा अपहार केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतरही पैसे परत न मिळाल्याप्रकरणी त्याच्याविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com