गल्लीबोळातही पोहोचणार अग्निशमन दलाचे जवान

गल्लीबोळातही पोहोचणार अग्निशमन दलाचे जवान

मुंबई, ता. २३ : मुंबईच्या घनदाट लोकवस्तीत दाटीवाटीने वसलेल्या चाळींमध्ये आग लागल्यास अग्निशमन दलापुढे आव्हान उभे राहते. मात्र, लवकरच अग्निशमन दलाच्या ताफ्यात मिनी रोसेनबॉअर टर्नटेबल लॅडर दाखल होणार असल्याने जवानांना गल्ल्यांमधून वाट काढत घटनास्थळी तातडीने पोहचणे शक्य होणार आहे. अशा भागात पोहचण्यासाठी टर्नटेबल लॅडर आवश्यक ठरणार असून मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्याची खरेदी करण्यात येणार आहे.

रोसेनबॉअर टर्नटेबल लॅडर आकाराने लहान असली तरी तिची काम करण्याची क्षमता अन्य वाहनांप्रमाणेच असणार आहे. चाळींची उंची कमी असल्याने अशा वाहनांचा बचावकार्यासाठी विशेष फायदा होणार आहे. आगीच्या धुरापासून बचाव करण्याची विशेष यंत्रणा त्यात असल्याचा दावा अग्निशमन दलाकडून करण्यात आला आहे.

मुंबईत सातत्याने लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दल आणखी बळकट करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. अलीकडेच अग्निशमन दलात जर्मन तंत्रज्ञानाची ६४ मीटर उंच रोसेनबॉअर टर्नटेबल लॅडर दाखल झाली. आता मिनी रोसेनबॉअर टर्नटेबल लॅडर पालिकेकडून खरेदी केली जाणार आहे. त्याबाबतच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम नुकतीच जर्मनीला गेली होती.

अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यावर भर
मुंबई अग्निशमन दल देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीमध्ये अग्रस्थानी आहे. अग्निशमन दलाने परदेशातही आपत्कालीन परिस्थितीत काम केले आहे. वाढत्या आगीच्या दुर्घटनांच्या घटना लक्षात घेऊन अग्निशमन दल आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले उचलली असून अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यावर भर दिला आहे.

अग्निशमन दलाची सुसज्जता
- डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली
- आग विझविण्यासाठी रोबो
- ९० मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर
- आरटीक्युलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट
- विविध अत्याधुनिक यंत्रणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com