एसटीच्या ताफ्यात लवकरच टाटाच्या २५० नवीन बसेस

एसटीच्या ताफ्यात लवकरच टाटाच्या २५० नवीन बसेस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : एसटी महामंडळ ‘टाटा मोटर्स’च्या २५० चेसीस खरेदी करणार आहे. त्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, त्यामध्ये १२ मीटर लांबी असलेल्या २०० निमआराम आणि ५० शयनयान बसेसचे चेसीस खरेदी केल्यास लवकरच या बसेस एसटीच्या ताफ्यात सेवा देण्यासाठी सज्ज होणार आहेत.

महामंडळाने यापूर्वीच १२ मीटर लांबीच्या २५० चेसीस खरेदीचे आदेश दिलेले होते. त्यावर चेसीवरील बस बॉडी बांधणीकारांकडून बांधणीचे काम महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत करण्याचे नियोजन केले होते. मात्र, एसटी महामंडळाच्या सध्या स्थितीनुसार या नियोजनात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामंडळाने मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चेसीस स्वीकारण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावण्यात आले आहे. बैठकीमध्ये यापूर्वी चेसीस स्वीकारण्यात आल्याची माहिती आणि चेसीस स्वीकारताना येणाऱ्या अडचणींची माहितीसाठी अधिकाऱ्यांना सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यावेळी ‘टाटा मोटर्स’चे अधिकारीसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com