लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खारघर सेक्टर-५ भागात घडली आहे. पानो कुमारी (वय १८) असे या मृत तरुणीचे नाव असून पोलिसांनी तरुणीचा प्रियकर आकम पारधी (वय २०) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेतील मृत पानो कुमारी ही तिच्या आईसोबत घरकाम करण्यासाठी जात होती. पानो कुमारीचे त्याच भागात राहाणाऱ्या आकम पारधीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यादरम्यान आकमने पानो कुमारी हिला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र त्यानंतर आकमने पानो कुमारीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. यावरून १० फेब्रुवारी रोजी पानो कुमारी आणि आकम पारधी या दोघांमध्ये भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी मानसिक तणावाखाली गेलेल्या पानो कुमारीने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिची आई व बहीण बाहेर गेली असल्याचे पाहत घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत पानो कुमारी हिचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी पानो कुमारीच्या बहिणीने खारघर पोलिस ठाण्यात आकम पारधी विरोधात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com