फसवणूक करणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांना अटक

फसवणूक करणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांना अटक

मुंबई, ता. २६ : विक्रीकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना एल. टी. मार्ग पोलिसांनी सात तासांत अटक केली. संजयसिंग कचरोली आणि रझिया शेख अशी अटक केलेल्या तोतया अधिकाऱ्यांची नावे आहेत.
या प्रकरणात तक्रारदार जठाराम मडाजी प्रजापती २५ फेब्रुवारीला सायंकाळी व्यवहाराचे ३२ लाख रुपये घेऊन काळबादेवी परिसरातून निघाले. काही अंतरावर एक अनोळखी इसम व एक अनोळखी महिला यांनी ते सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडे असलेल्या पैशांबाबत विचारपूस करू लागले. प्रजापती यांनी तोतया अधिकाऱ्यांना हे व्यवहाराचे पैसे असल्याचे सांगितले; परंतु कारवाईची धमकी देत ते त्यांच्याकडून पैसे आणि त्यांचा मोबाईल घेऊन गेले. याप्रकरणी जठाराम प्रजापती यांनी एल. टी. मार्ग पोलिसात गुन्ह्याची नोंद केली असता सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मंगलदास मार्केट परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com