उल्हासनगरात क्रीडा स्पर्धेत ३०० कामगार सहभागी

उल्हासनगरात क्रीडा स्पर्धेत ३०० कामगार सहभागी

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : सेच्युरी रेयॉन कंपनीने आयोजित केलेल्या सेन्रे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या तब्बल ३०० कामगारांनी विविध खेळात ठसा उमटवला असून कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना शाबासकी दिली. २० ते २६ फेब्रुवारीच्या कालावधीत क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, खो-खो आदी विविध खेळांच्या सेन्रे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या रामलीला मैदानात करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे दिग्विजय पांडे (युनिट हेड), श्रीकांत गोरे, (एचआर प्रमुख), ए. के. सहेल आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले. या वेळी कामगार युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर, रमेश यादव (महामंत्री), कृष्णा पाटील (उपाध्यक्ष) व पदाधिकारी, कामगार, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांमध्ये सांघिक भावना निर्माण होण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कंपनीच्या वतीने क्रीडा स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com