दूषित पाण्यामुळे तुर्भेत पोटदुखी

दूषित पाण्यामुळे तुर्भेत पोटदुखी

तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून तुर्भे स्टोअर परिसरातील नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यातून जंतू, किडे येत असल्याने अनेकांना विविध आजारदेखील बळावल्याने भीतीचे वातावरण आहे.
स्वतःच्या मालकीचे धरण अशी नवी मुंबई महापालिकेचा ख्याती आहे. मात्र, याच शहरात राहत असलेल्या नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तुर्भे स्टोअर परिसरात चार-पाच दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच या पाण्यातून किडे, जंतूदेखील बाहेर पडत असल्याने नागरिकांना पोटाच्या विविध विकारांनी ग्रासले आहे. महत्त्वाचे म्हणजे, तुर्भे परिसराला पाणी-पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या उघड्या गटारांलगत असून गळतीमुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
----------------------------------------
तुर्भे स्टोअर परिसरात येणाऱ्या गढूळ पाण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टाकीचा उपसा करण्यात येत आहे. तसेच काही जलवाहिन्या गटार तसेच ड्रेनेज लाईनजवळ असल्याने गढूळ पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नितीन तारमाळे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, तुर्भे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com