खोपरा गावात बिबट्याची दहशत

खोपरा गावात बिबट्याची दहशत

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : भाईंदर पश्चिमजवळील खोपरा गावात सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असून त्याच्या पायाचे ठसेदेखील आढळून आले आहेत. त्यामुळे या भागात वन विभागाने ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून डोंगरी ते गोराईपर्यंतच्या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी उत्तन भागात बिबट्या असल्याचे समजल्यानंतर वन विभागाने कॅमेरे बसवले होते. त्यावेळी बिबट्या कॅमेऱ्‍यात बंदिस्त झाला होता. मात्र तो वन विभागाच्या हाती लागला नव्हता. आता उत्तनच्याच खोपरा गावात त्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरातील श्वान, कोंबड्या, तसेच डुकरे अचानक कमी होऊ लागली असल्यामुळे बिबट्याच्या वावराला पुष्टी मिळाली आहे. गावातील मानवी वस्तीलगत त्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. शुक्रवारी रात्री एका घराच्या छतावर बिबट्याने उडी मारल्याचा आवाज आला आहे. त्यामुळे सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत.
याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रेयस सावंत, निखिल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांनी वन विभागाला दिल्यानंतर या विभागाने परिसरात कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्‍यांचे चित्रिकरण वन विभागाने तपासणीसाठी नागपूर येथे पाठवले आहेत. नागपूर कार्यालयातून आदेश आल्यानंतर वन विभाग पुढील कार्यवाही करणार आहे, अशी माहिती श्रेयस सावंत यांनी दिली.
-------------------------------------
भाईंदर : खोपरा गावात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com