श्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान
श्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान

श्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान

sakal_logo
By

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव व मिरा-भाईंदर येथील विविध ठिकाणी महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत मिरा-भाईंदर व नायगाव क्षेत्रातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत एकूण १४७७ श्री सदस्यांनी सहभाग घेऊन तब्बल १६.५७ टन ओला व सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली व मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आले.
स्वच्छता अभियानासोबतच श्री सदस्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीही केली. स्वच्छतेतून मानवी आरोग्य, स्वच्छता ही काळाची गरज, झाडे लावा-झाडे जगवा व स्वच्छतेतून निसर्गाचा समतोल आदी फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात असून खूप मोठ्या संख्येने श्री सदस्य या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा महास्वच्छता अभियानाचा उपक्रम गौरवास्पद असून यामुळे स्वच्छतेची जनजागृती घराघरांत पोहोचत आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त रवी पवार व इतर अधिकारी सहभागी झाले होते.