आसनगाव परिसरातील नऊ गावे चकाचक

आसनगाव परिसरातील नऊ गावे चकाचक

भिवंडी, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त धामणकर नाका, पद्मानगर या परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी भाजप भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष एम. शेट्टी सोबत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे असंख्य अनुयायी उपस्थित होते. नुकताच डॉ. आप्पा धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभूषण देऊन सन्‍मान केला. श्री सेवा आणि दासभक्ती या अध्यात्माच्या बैठकीतून प्रतिष्ठानने अनेकांना व्यसनमुक्त करून त्यांना जीवनाचा मार्ग सांगितला. त्यामुळे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी राज्यात, देशात आणि जगातील विविध ठिकाणी निरूपण करीत आहे. त्यामधून स्वच्छतेचे आणि वृक्ष संवर्धनाचे काम सर्वत्र सुरू आहे.

कल्याणमध्ये महास्वच्छता अभियान
कल्याण, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कल्याण पश्चिम येथे महास्वच्छता अभियान पार पडले. या अभियानांतर्गत कल्याण शहर स्वच्छ करण्यात आले. त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली. यावेळी न्यायालय व तहसील कार्यालय परिसरातही स्वच्छता करण्यात आली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक योगदान अभूतपूर्व असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उत्तरेकडील गेटच्या बाजूला असलेल्या विहिरीला मुबलक पाणी असून ते स्वच्छ करून, उपसा काढून, गाळ काढून देण्याची विनंती कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांना श्री सदस्यांनी केली. या विहिरीच्या पाण्याचा उपयोग स्वच्छतागृह व झाडांना होणार आहे. न्यायालयाच्या परिसरामध्ये पक्षकारांसाठी असलेले स्वच्छतागृह मोठे असून, पाण्याअभावी त्याठिकाणी दुर्गंधी आहे. विहिरीचा पाण्याचा उपयोग करून ते वापरात आणले जाईल आणि स्वच्छताही राहील, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com