विद्यार्थ्यांसाठी आकाशगंगा अवतरली

विद्यार्थ्यांसाठी आकाशगंगा अवतरली

वाशी, ता. २ (बातमीदार) : रबाळे येथे नवी मुंबई महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अ‍ॅक्टिव्हिटी झोन पालिकेकडून साकरण्यात आले आहे. या झोनचे उद्‍घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते बुधवारी (ता. १) करण्यात आले. या अ‍ॅक्टिव्हिटी झोनचे काम ठेकदाराने ठरलेल्या वेळेपेक्षा आधीच केले आहे. या झोनमध्ये आकाशगंगा, गुरुत्वाकर्षण, सापशिडी, बुद्धिबळ याच्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकता येणार आहे.
माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेचे छत्रपती शाहू महाराज विद्यालय उभारण्यात आले आहे. या विद्यालयाच्या प्रांगणात सोनवणे यांच्या संकल्पनेतून शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांनी अ‍ॅक्टिव्हिटी झोन साकारले आहे. या झोनसाठी पालिकेकडून एक कोटी आठ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांतून शिकता यावे, यासाठी झोनची निर्मिती केली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून आकाशगंगा न दाखवता प्रात्याक्षिक दाखवले जाणार आहे. आकाशगंगा उद्यानाच्या बाजूला असलेल्या भिंतींवर गणित, भूगोल, विज्ञान या विषयांचे चित्र आहेत. त्यामुळे हे उद्यान आकर्षित वाटत आहे. उद्यानामध्ये नऊ ग्रह, सूर्य; त्याचप्रमाणे बुद्धिबळ, सापशिडीचा पट साकारला आहे. या ठिकाणी जम्पिंग वॉलदेखील बांधला आहे. त्यावर एका विद्याार्थिनीने प्रात्याक्षिकही करून दाखवले. या अ‍ॅक्टिव्हिटी झोनच्या उद्‍घाटनाप्रसंगी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कौतुक करत स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया दिली.

सीबीएसई शाळांमध्ये प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून शिकवण्यात येते. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही यामधून शिकता यावे, यासाठी अ‍ॅक्टिव्हिटी झोन साकारण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी स्मार्ट बनतील.
- सुधाकर सोनवणे, माजी महापौर, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com