पायी चालताना धक्का लागल्याने खून

पायी चालताना धक्का लागल्याने खून

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : पायी चालताना केवळ धक्का लागल्याचे पडसाद चक्क खुनात उमटल्याची घटना उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. खेमानी परिसरात राहणारा निरंजन यादव हा कॅम्प ३ च्या फार्व्हर लाईन चौक येथील पप्पू किराणा स्टोअर्स समोरून बुधवारी रात्री जात होता. त्याचा धक्का अजय ऊर्फ अज्जू चौहान याला लागला. याचा राग येऊन अजयने लाकडी दांडक्याने निरंजनला मारहाण केली आणि याच मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळताच घटनास्थळी पोहचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. पोलिस पथकाने सीसी टीव्ही चित्रीकरण आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे अजयला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com