३५० व्या शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी सूचना पाठवा

३५० व्या शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी सूचना पाठवा

मुंबई, ता. ४ : ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याला २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. ३५० वा वर्धापन सोहळा सांस्कृतिक विभागातर्फे शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यापूर्वी अर्थमंत्री असताना मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर सामान्यांच्या कल्पना मागवल्या होत्या.

सुधीर मुनगंटीवार यांनी सोहळ्यासंदर्भात एक पत्र राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आणि पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकारी-पदाधिकारी आदींना पाठविले आहे. बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत शिवाजी महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले. ६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ही घटना केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे; तर साऱ्या देशाच्या दृष्टीने एक असाधारण बाब होती. म्हणूनच राज्याभिषेक सोहळा अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने सूचना पाठवण्याचे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.

२ ते २० जूनदरम्यान महोत्सव
२०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. २ ते २० जून २०२४ या काळात शिवराज्याभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सूचना पाठवाव्यात, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात केले आहे. min.culture@maharashtra.gov.in संकेतस्थळावर पाठवलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल, असेही पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com