लाईनमन दिनानिमित्त वीज कर्मचाऱ्यांना शुभेच्छा

लाईनमन दिनानिमित्त वीज कर्मचाऱ्यांना शुभेच्छा

कासा, ता. ७ (बातमीदार) : लाईनमन म्हणून काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लाईनमन दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. नेहमी जीव धोक्यात घालून उन्ह, पाऊस, वारा असो की कोणतीही आपत्ती असली तरी रात्रंदिवस काम करणाऱ्या कासा-चारोटी वीज वितरण कार्यालयातील १५ लाईनमनचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच चारोटी-कासा शाखा अभियंता चंदन मोरे यांनी कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com