आठ हजार विद्यार्थिनी स्वरक्षणाचे धडे

आठ हजार विद्यार्थिनी स्वरक्षणाचे धडे

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल ता. ७ (वार्ताहर) ः समाजकंटक, रोडरोमियोंचा मुकाबला करण्यासाठी त्याचबरोबर स्‍वरक्षणासाठी पनवेल, उरणमधील जवळपास आठ हजार शालेय विद्यार्थिनींना तायक्वांदोचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत. एकूण १०८ शाळांमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेंतर्गत हा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. असे असले तरी आजही समाजात नीतिमूल्यांचा ऱ्हास होत असल्याची वेगवेगळ्या घटनांवर दिसून येत आहे. कोपर्डीची घटना हे जिवंत उदाहरण आहे. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा नराधमांनी बळी घेतला.अशा प्रदूषित समाजात कित्येकदा विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात येते. अशावेळी घाबरून, अन्याय-अत्याचार सहन न करता, गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा मुकाबला करून स्वत:चे रक्षण करणे आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आला. त्याच जाणीवेतून राणी लक्ष्मीबाई आत्मनिर्भर योजनेतून माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सदानंद निंबरे, प्रभाकर भोईर, अनिल म्हात्रे, अजय सूर्यवंशी, दिनेश भोपी, राकेश जाधव, दीप्ती पांगम, संतोष पालेकर, तेजस माळी, रूपेस माळी, सोनू वडगीर, प्रवीण पाटील, दिनेश म्हात्रे, अक्षता भगत, गौरी पाटील, दिक्षा भगत, जागृती भगत, सचिन मोरे, प्रशांत घरत, सीमा मरचंड हे प्रशिक्षक मुलींना सक्षम करण्यासाठी प्रत्येक शाळेवर जाऊन प्रशिक्षण देत आहेत.

स्वयंसिद्धसाठी विद्यार्थिनी सक्षम
राणी लक्ष्मीबाई आत्मनिर्भर योजनेनुसार विद्यार्थिनींना संकटातून स्वत:चा बचाव करणे, वर्तुळाकृती वेढ्यातून स्वत:ची अथवा दुसऱ्याची सुटका करणे आदी विविध गोष्टींचे धडे दिले आहे. या उपक्रमाला सर्वच शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सहकार्य मिळत असल्याचे प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले.

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेंतर्गत पनवेल ८४ शाळा व उरण २४ शाळा तालुक्यातील विविध जिल्‍हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलींना तायक्वांदोचे धडे दिले जातात. सध्या पनवेल तालुक्यातील शाळांमधील मुलींना हे प्रशिक्षण सुरू आहे. या उपक्रमासाठी पनवेल तालुक्यातील सर्व अधिकारी केंद्रप्रमुख तसेच सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांचे अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे.
- सुभाष पाटील, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तायक्वांदो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com