मालमत्ता विभागाची वसुलीसाठी कसरत

मालमत्ता विभागाची वसुलीसाठी कसरत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : कोरोनाच्या कालावधीत पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला असून सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे असले, तरी महापालिकेला या वर्षीदेखील उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने फेब्रुवारी अखेरपर्यंत ६२९.९९ कोटींची वसुली केली असून निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी २८ दिवसांत १२२ कोटींची वसुली करावी करावी लागणार आहे.

कोरोनामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ पालिकेला बसवता आलेला नाही. आजही पालिकेचे मालमत्ता कर विभाग वगळता इतर विभागांना उत्पन्नात फारसे यश मिळालेले नाही. शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातूनच शहरात सुशोभीकरण आणि रस्त्यांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. दुसरीकडे पालिकेवर आजही २७०० कोटींच्या आसपास दायित्व आहे. ठेकेदारांची बिलेदेखील टप्प्याटप्प्याने दिली जात आहेत. उत्पन्नवाढीसाठी पालिकेच्या विविध विभागांच्या बैठका होत आहेत. असे असले तरीदेखील अद्यापही पालिकेच्या तिजोरीत उत्पन्न फारशा प्रमाणात मिळू शकलेले नाही. पालिकेची मदार मालमत्ता करावरच अवलंबून असल्याचे यंदाही दिसून आले आहे. मालमत्ता कर विभागाला ७५२ कोटींचे निर्धारित लक्ष्य देण्यात आले होते. त्यानुसार फेब्रुवारीअखेरपर्यंत ६२९.९९ कोटींची वसुली या विभागाला करता आलेली आहे. त्यात आता अवघ्या २८ दिवसांत या विभागाला १२२ कोटींची वसुली करावी लागणार आहे.

......................................

पालिकेला मिळालेले उत्पन्न

प्रभाग समिती मिळालेले उत्पन्न (कोटीत)
उथळसर - ४३.२९
नौपाडा, कोपरी - ७६.७८
कळवा - २२.९८
मुंब्रा - २६.६५
दिवा - ३०.९७
वागळे इस्टेट - २०.६५
लोकमान्य नगर - २४.९९
वर्तकनगर - ८७.९१
माजिवडा, मानपाडा - २१४.४२
हेड ऑफिस - ८१.३५
---------------------------------
एकूण - ६२९.९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com